सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा: ताहा खानची आगेकूच कायम

दुसऱ्या फेरीच्या अन्य सामन्यात, विनय स्वामीनाथनने सुरेख खेळ करताना तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रनला ३-० असे पराभूत केले.
सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धा: ताहा खानची आगेकूच कायम

मुंबई : पुण्याच्या ताहा खानने दमदार फॉर्म कायम राखताना पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत बेस्ट ऑफ सेव्हन फ्रेममध्ये होम चॅलेंजर सिद्धार्थ खेमाणीचा ४-० असा सरळ फ्रेममध्ये पराभव करताना क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित सीसीआय स्नूकर क्लासिक स्पर्धेतील आगेकूच कायम ठेवली.

सीसीआयच्या सर विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत खानने सातत्य राखत खेमाणीवर ५४-४३, ७२-५८, ५८-३४, ५६-९ अशी मात करताना मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, पात्रता फेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात आदित्य अग्रवालने दुसऱ्या आणि तिसऱ्या फ्रेममध्ये ५१ आणि ५६ अशा दोन महत्त्वपूर्ण ब्रेकसह समीर छाबरियाचा ३-० (५५-६, ७४-१६, ७७-१६) असा पराभव केला.

दुसऱ्या फेरीच्या अन्य सामन्यात, विनय स्वामीनाथनने सुरेख खेळ करताना तामिळनाडूच्या अनुपमा रामचंद्रनला ३-० असे पराभूत केले. गेल्या मार्चमध्ये बँकॉक येथे झालेल्या जागतिक महिला स्नूकर स्पर्धेत २१ वर्षांखालील गटातील विजेती चेन्नईची खेळाडू अनुपमा ही स्वामिनाथनच्या उत्कृष्ट खेळासमोर निष्प्रभ ठरली. तिने पहिल्या फ्रेममध्ये विक्रमी ६९ गुणांच्या ब्रेकसह ९१-०, ५४-४४, ५४-३० अशी बाजी मारली. अनुपमाने पहिल्या फेरीत शाकीर कुरेशीचा ३-१ असा पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in