टी-२० मालिका वाचवण्याचे भारतीय महिलांपुढे आव्हान, चेन्नई येथे आज दक्षिण आफ्रिकेशी तिसरा सामना

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ मंगळवारी टी-२० मालिका वाचवण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीवर पावसाचे सावट कायम आहे.
टी-२० मालिका वाचवण्याचे भारतीय महिलांपुढे आव्हान, चेन्नई येथे आज दक्षिण आफ्रिकेशी तिसरा सामना

चेन्नई: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ मंगळवारी टी-२० मालिका वाचवण्याच्या हेतूने मैदानात उतरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीवर पावसाचे सावट कायम आहे. त्यामुळे पाऊस पुन्हा चाहत्यांचा हिरमोड करणार की भारतीय संघ बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल, आफ्रिकेचा संघ जून महिन्यात भारतीय दौरा करण्यासाठी आला. भारताने प्रथम त्यांना एकदिवसीय मालिकेत ३-० अशी धूळ चारली. त्यानंतर एकमेव कसोटी सामन्यातही भारताने वर्चस्व गाजवले. मात्र टी-२० मालिकेतील पहिल्या लढतीत आफ्रिकेने १२ धावांनी सरशी साधली. तर दुसरा सामना एका इनिंगनंतर पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आफ्रिका मालिकेत १-० अशी आघाडीवर असून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताने अखेरची लढत जिंकणे गरजेचे आहे. वर्षअखेरीस होणान्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.

भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असेल. दोन लढतींमध्ये भारताने अनुक्रमे १८९ व १७७ धावा लुटल्या. पूजा वस्त्रकारने दौन सामन्यांत ४ बळी मिळवले आहेत. मात्र रेणुका सिंग व सजीवन सजना यांना छाप पाडता आली नाही. तसेच राधा यादव व श्रेयांका पाटील या फिरकीपटूंनी निराशा केली आहे. फलंदाजीत जेमिमा रॉड्रिग्ज सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. मात्र स्मृती मानधना व शफाली वर्मा यांच्याकडून चांगली सलामी अपेक्षित आहे. तसेच हरमनप्रीतही उत्तम लयीत आहे. मंगळवारीही ४० ते ५० टक्के पावसाची शक्यता असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० धावा केल्यास, त्या विजयासाठी पुरेशा ठरू शकतात. दुसरीकडे आफ्रिकेची भिस्त कर्णधार लॉरा वोल्वर्ड, सलामीवीर ताइिमन ब्रिट्स, मॅरिझेन काप या फलंदाजांवर आहे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत: हरमन्धीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, उमा छेत्री, रिचा घोष, दयालन हेमलता, जेमिमा रॉड्रिग्ज, शफाली वर्मा, अमनजोत कौर, श्रेोका पाटील, सजीवन सजना, दीप्ती शर्मा, आशा शोबना, अरुंधती रेडी, पूजा वस्त्रकार, रेणुका सिंग, शबनम शकिल, राधा यादव.

दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वर्ड (कर्णधार), ताइिमन ब्रिट्स, मिक रीडर, सिनालो जाफ्ता, अनेक बोश, नेडिन डी क्लर्क, अनारी डेरेकसेन, मैरिझेन काप, सून लूस, क्लो ट्रायन, आयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा, मसाबाता क्लास, एलिझ मेरी, टुमी सेखुखूने.

वेळ: सायंकाळी ७ वाजता

थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ वाहिनी व जिओ सिनेमा अॅप

logo
marathi.freepressjournal.in