मुंबई : रशियन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर येथे इंडियन चेस स्कूलतर्फे आयोजित ३६० वन वेल्थ ग्रँड प्रिक्स बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित गुरूप्रकाशने अर्णव थत्तेची घोडदौड रोखताना पाचव्या फेरीअखेर ४.५ गुणांसह संयुक्तरित्या आघाडी मिळवली. दुसरा मानांकित दर्श शेट्टी, प्रथमेश गावडे, कुश अग्रवाल यांच्या खात्यातही प्रत्येकी ४.५ गुण जमा आहेत. पाचव्या फेरीत गुरूप्रकाशने अर्णवला ४.५-४ असे नमवले. अन्य लढतींमध्ये दर्शने मुकूल राणेला, प्रथमेशने अर्जुन सिंगला, तर कुशने तन्मय मोरेला पराभूत केले.