पराभवासाठी स्थित्यंतराला जबाबदार धरणे योग्य नाही; चेतेश्वर पुजाराचे मत

ईडन गार्डन्सवरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील पराभवाला संक्रमणाचा काळ जबाबदार असल्याच्या मताला भारतीय संघाचा माजी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने विरोध केला आहे.
पराभवासाठी स्थित्यंतराला जबाबदार धरणे योग्य नाही; चेतेश्वर पुजाराचे मत
पराभवासाठी स्थित्यंतराला जबाबदार धरणे योग्य नाही; चेतेश्वर पुजाराचे मत
Published on

नवी दिल्ली : ईडन गार्डन्सवरील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील पराभवाला संक्रमणाचा काळ जबाबदार असल्याच्या मताला भारतीय संघाचा माजी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने विरोध केला आहे. संघाच्या पुनर्बांधणीच्या काळात परदेशात पराभव होणे काही प्रमाणात समजू शकतो. पण घरच्या मैदानावर विशेषत: चांगल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाने पराभूत होणे स्वीकारार्ह नाही, असे पुजारा म्हणाला.

भारताचा घरच्या मैदानावर झालेला पराभव संक्रमण काळामुळे झाला, या मताशी मी सहमत नाही. संक्रमण काळात परदेशात खेळताना काही अडचणी येऊ शकतात, हे मान्य केले जाईल. पण सध्याच्या भारतीय संघात प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल असे तगडे खेळाडू भारताच्या ताफ्यात आहेत. हे तगडे खेळाडू असूनही संघ घरच्या मैदानावर पराभूत होत असेल, तर काहीतरी चुकीचे होत आहे. सामना चांगल्या पिचवर झाला असता, तर भारताच्या जिंकण्याच्या शक्यता खूप जास्त असत्या, असे तो म्हणाला.

एवढे प्रतिभावान खेळाडू असताना भारत ‘अ’ संघ देखील घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला आव्हान देऊ शकतो. त्यामुळे क्षमता नसण्याचा प्रश्नच नाही. म्हणूनच, भारतातील या पराभवासाठी संक्रमणाला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही, असे पुजारा म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in