Paris Olympics 2024 : सुवर्णपदकांमध्ये टाय; मात्र अग्रस्थान अमेरिकेचेच

अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेल्या अग्रस्थानासाठीच्या चढाओढीत अमेरिकेने बाजी मारली. त्यामुळे चीनने यंदा अमेरिकेकडून अग्रस्थान हिसकावण्याचा केलेला दावा फोल ठरला.
Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले अमेरिकेचे खेळाडू
Published on

पॅरिस : अमेरिकेने पुन्हा एकदा चीनचा कडवा प्रतिकार मोडून काढताना ऑलिम्पिकमध्ये आपणच महासत्ता असल्याचे दाखवून दिले. अखेरच्या दिवसापर्यंत रंगलेल्या अग्रस्थानासाठीच्या चढाओढीत अमेरिकेने बाजी मारली. त्यामुळे चीनने यंदा अमेरिकेकडून अग्रस्थान हिसकावण्याचा केलेला दावा फोल ठरला.

स्पर्धेअंती अमेरिका आणि चीन यांच्या खात्यावर समान ४० सुवर्णपदके होती. मात्र, रौप्यपदके आणि एकूण पदकांच्या बाबतीत अमेरिकेने चीनला मोठ्या फरकाने मागे सोडले. अमेरिकेला सलग चौथ्यांदा पदकतालिकेत अग्रस्थान पटकावण्यात यश आले.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक महिलांच्या बास्केटबॉलमध्ये दिले गेले. त्यापूर्वी चीनची ४०, तर अमेरिकेची ३९ सुवर्णपदके होती. अखेर अमेरिकेच्या महिला संघाने यजमान फ्रान्सवर ६७-६६ असा निसटता विजय मिळवून देशाला ४०वे सुवर्णपदक मिळवून दिले. अमेरिकेने ४० सुवर्ण, ४४ रौप्य आणि ४२ कांस्य अशी एकूण १२६ पदके मिळवली.

दुसऱ्या स्थानावरील चीनची ४० सुवर्ण, २७ रौप्य आणि २४ कांस्य अशी ९१ पदके झाली. आशियातील जपानने तिसरे स्थान मिळवताना २० सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य अशी ४५ पदके कमावली. ऑस्ट्रेलिया व फ्रान्स यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान प्राप्त केले.

logo
marathi.freepressjournal.in