राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राणी रामपालकडे पुन्हा दुर्लक्ष

गोलरक्षक सविता पुनियाकडेच भारताच्या १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राणी रामपालकडे पुन्हा दुर्लक्ष

बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला हॉकी संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. या संघात अनुभवी राणी रामपालला पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने स्तान देण्यात आलेले नाही. त्यामुळे गोलरक्षक सविता पुनियाकडेच भारताच्या १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आलेले आहे.

पुढील वर्षी महिलांच विश्वचषक रंगणार असून त्यासाठी निवडण्यात आलेल्या संघाचे कर्णधारपदसुद्धा सविताच भुषवणार आहे. १ ते १७ जुलैदरम्यान विश्वचषक, तर २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा खेळवण्यात येईल. राष्ट्रकुलसाठी भारताचा समावेश अ-गटात करण्यात आला असून त्यांना घाना, इंग्लंड, कॅनडा आणि वेल्सशी दोन हात करायचे आहेत.

राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले. परंतु राणीला प्रो हॉकी लीगमध्ये स्नायूंची दुखापत झाली. त्यामुळे तिला विश्वचषक तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील संघात स्थान देण्यात आले नाही.

भारताचा संघ

सविता पुनिया (कर्णधार), रजनी इटिमप्रू, ग्रेस एक्का, गुर्जित कौर, निक्की प्रधान, उदिता, निशा, सुशिला चानू, मोनिका, नेहा, ज्योती, नवजोत कौर, सलिमा टेटे, वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी, संगिता कुमारी.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in