इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यावर कोरोनाचे सावट, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह

शनिवारी झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्माने फलंदाजी केली नाही
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यावर कोरोनाचे सावट, रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह

भारताला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा असतानाच कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ न शकलेल्या सामन्यावर यावेळीही कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.

शनिवारी झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्माने फलंदाजी केली नाही. रात्री उशिरापर्यंत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. रोहित निष्काळजीपणामुळे कोविड-१९ पॉझिटिव्ह झाल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयने नुकताच बायो बबल काढून घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर खेळाडू कोरोना विषाणूबाबत निर्भय झाले. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट मास्क न लावता लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले. दोघांनी चाहत्यांसोबत सेल्फीही घेतला. आयपीएल २०२२चे आयोजन बायो-बबलमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बायो-बबल नव्हते. भारतीय खेळाडूही बायो बबलमुळे होणाऱ्या थकव्यामुळे बीसीसीआयने बायो-बबल काढले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in