माझ्या पुनरागमनाचे श्रेय बुमराला; मोहम्मद सिराजचे प्रतिपादन

न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थच्या कसोटीत ५ विकेट घेऊन फॉर्मात परतलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या या शानदार कामगिरीचे श्रेय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराला दिले आहे.
माझ्या पुनरागमनाचे श्रेय बुमराला; मोहम्मद सिराजचे प्रतिपादन
Published on

कॅनबेरा : न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थच्या कसोटीत ५ विकेट घेऊन फॉर्मात परतलेला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या या शानदार कामगिरीचे श्रेय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराला दिले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या घरच्या मालिकेत ३० वर्षीय सिराजने खराब कामगिरी केली होती. त्याने दोन कसोटी सामन्यांत केवळ २ विकेट मिळवले होते. या मालिकेत भारताला ०-३ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. या निराशाजनक कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात सिराजने शानदार पुनरागमन केले आहे.

सिराज म्हणाला की, पर्थ कसोटी सामन्याआधी त्याने कर्णधार आणि अव्वल दर्जाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराशी चर्चा केली. त्याचा फायदा सिराजला पहिल्या कसोटी सामन्यात झाला. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ १५० धावांवर कोसळला. मात्र शानदार गोलंदाजीच्या बळावर भारताने या सामन्यात २९५ धावांनी बाजी मारली.

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन संघाविरुद्धच्या सराव सामन्यात रविवारी भारताने ६ विकेटने विजय मिळवल्यानंतर सिराज म्हणाला की, मी नेहमीच बुमराशी चर्चा करतो.

पुढे सिराज म्हणाला की, पहिल्या सामन्यापूर्वी मी बुमराशी चर्चा केली होती. पर्थ कसोटीत मी काय करायला हवे याबाबत बुमराशी बोललो. त्याने मला एक गोष्ट सांगितली की, विकेट घेण्याच्या मागे धावू नकोस, ठरावीक ठिकाणी चेंडू टाकत राहा आणि गोलंदाजीचा आनंद घे. तरीही तुला विकेट नाही मिळाली तर तू माझ्याशी बोलायला ये. त्यानंतर मी गोलंदाजीचा आनंद घेतला आणि विकेटही मिळवल्याचे सिराज म्हणाला.

मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या जसप्रीत बुमराने शानदार गोलंदाजी केली आहे.

बुमरामध्ये कर्णधार होण्याची क्षमता - पुजारा

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरामध्ये चांगला कर्णधार होण्याची क्षमता आहे. रोहित शर्मानंतर बुमराकडे कर्णधार म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे मत भारताचा माजी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले.

नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराने दबावाखाली असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवल्याचे पुजारा म्हणाला. क्रीडा वृत्तवाहिनीशी तो बोलत होता.

घरच्या मालिकेत भारताने निराशाजनक कामगिरी केली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने शानदार कामगिरी केली. मला वाटते की बुमरामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. जर का तुम्ही त्याचे निरीक्षण केले तर असे दिसते की तो कधीच केवळ स्वत:बद्दल बोलत नाही, तर तो संघाबद्दल बोलत असतो. खेळाडूंबद्दल बोलत असतो. त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे पुजारा म्हणाला.

भरत अरुण, मॉर्केल यांचेही मोलाचे मार्गदर्शन

भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचीही सिराजला त्याचा फॉर्म परत मिळवण्यासाठी मदत मिळाली. सिराज म्हणाला की, न्यूझीलंड मालिकेनंतर मी काय करायला हवे याबद्दल भरत अरुण यांच्याशीही बोललो. कारण अनेक वर्षांपासून ते माझी गोलंदाजी पाहत आले आहेत. तसेच त्यांना माझ्या गोलंदाजीबद्दल अनेक गोष्टी माहित आहेत. त्यांनीही मला तेच सांगितले की, विकेटच्या मागे धावू नकोस, गोलंदाजीचा आनंद घे. तू नक्कीच विकेट मिळवशील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप सर यांना मी हैदराबादमध्ये भेटलो. त्यावेळी आम्ही सरावही केला. त्याचाही मला फायदा झाला. भारताचे विद्यमान गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी मला सांगितले की, तू योद्धा आहेस. तू आम्हाला विकेट मिळवून देणार आहेस. गोलंदाजीचा तू आनंद घेत राहा, असे मॉर्केल म्हणाले.

बुमरामध्ये कर्णधार होण्याची क्षमता - पुजारा

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरामध्ये चांगला कर्णधार होण्याची क्षमता आहे. रोहित शर्मानंतर बुमराकडे कर्णधार म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे मत भारताचा माजी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले.

नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराने दबावाखाली असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवल्याचे पुजारा म्हणाला. क्रीडा वृत्तवाहिनीशी तो बोलत होता.

घरच्या मालिकेत भारताने निराशाजनक कामगिरी केली. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने शानदार कामगिरी केली. मला वाटते की बुमरामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे. जर का तुम्ही त्याचे निरीक्षण केले तर असे दिसते की तो कधीच केवळ स्वत:बद्दल बोलत नाही, तर तो संघाबद्दल बोलत असतो. खेळाडूंबद्दल बोलत असतो. त्यांना मार्गदर्शन करत असल्याचे पुजारा म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in