क्रिकेटपटू मयांक आयसीयूत दाखल

भारतीय क्रिकेटपटू मयांक अगरवालची आगरतळा ते सूरतच्या विमान प्रवासात प्रकृती बिघडल्याने त्याला आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.
क्रिकेटपटू मयांक आयसीयूत दाखल

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू मयांक अगरवालची आगरतळा ते सूरतच्या विमान प्रवासात प्रकृती बिघडल्याने त्याला आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. ३२ वर्षीय मयांक हा रणजी स्पर्धेत कर्नाटकचे नेतृत्व करत आहे.

विमान प्रवासादरम्यान मयांक बाटलीबंद पेय प्यायला होता. त्यानंतर त्याला घशाचा त्रास जाणवू लागला. या बाटलीबंद पेयात हानीकारक पदार्थ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मयांक सध्या आगरतळा येथील आयएलएस रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आहे. दरम्यान, त्याची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे, असे मयांकची पत्नी आशिताने सांगितले.

मयांकला त्रास जाणवू लागल्याने दिल्लीला जाणारे विमान पुन्हा आगरतळा येथे उतरवण्यात आले. तिथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले, असे इंडिगो या विमानसेवा कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. कर्नाटकचा पुढील सामना २ फेब्रुवारीपासून रेल्वेविरोधात सूरतला होणार आहे. मयांक त्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in