इंग्लंडच्या बॅझबॉलवर त्यांच्याच माजी क्रिकेटपटूंची टीका

प्रशिक्षक बँडन मॅकलम यांनी मात्र याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे.
इंग्लंडच्या बॅझबॉलवर त्यांच्याच माजी क्रिकेटपटूंची टीका

राजकोट : इंग्लंड क्रिकेट संघाच्या बॅझबॉल शैलीवर तेथीलच माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. मायकेल वॉन, नासिर हुसैन, केव्हिन पीटरसन यांनी या वृत्तीवर कडाडून टीका केली आहे.

वॉन म्हणाला की बॅझबॉलच्या नावाखाली तुम्ही फक्त आक्रमण करू शकत नाहीत. कधी तुम्हाला कसोटी वाचवण्यासाठीही खेळावे लागेल. “बॅझबॉलमध्ये जर तुम्ही कसोटी गमावत असाल, तर त्या शैलीचा काहीच फायदा नाही. त्यामुळे इंग्लंडने विदेशातील खेळपट्ट्यांवर या शैलीत खेळताना विचार करण्याची गरज आहे,” असे हुसैन म्हणाला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मात्र संघातील खेळाडूंची पाठराखण केली आहे. तसेच अंपायर्स कॉल रद्द करण्याची विनंती केली आहे. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या तीन फलंदाजांना अंपायर्स कॉलद्वारे बाद देण्यात आले. त्यामुळे या निकालाचा संघाला फटका बसल्याचे स्टोक्स म्हणाला. प्रशिक्षक बँडन मॅकलम यांनी मात्र याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in