
झाग्रेब : क्रोएशियाचा माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू निकोला पोक्रीवॅक याचा कार अपघातात मृत्यू झाला. तो ३९ वर्षांचा होता. क्रोएशिया फुटबॉल फेडरेशनने ही माहिती दिली.
शुक्रवारी रात्री कर्लोवाक शहरात झालेल्या कार अपघातात पोक्रीवॅकचा मृत्यू झाला, असे फेडरेशनने जाहीर केले.
डिनामो झग्रेब, मोनॅको आणि सर्ल्झबर्ग या क्लबकडून पोक्रीवॅक खेळला आहे. क्रोएशियाच्या राष्ट्रीय संघातून तो १५ सामने खेळला आहे. पोक्रीवॅक हा एक महान खेळाडू होता. त्याने धाडसाने गंभीर आजारावर विजय मिळवला होता, अशा शब्दात क्रोएशिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष मरिजन कुस्टीक यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.