वेस्टर्न आणि साऊदर्न स्पर्धेत क्रोएशियाचा 'या' खेळाडूने पटकावले विजेतेपद

२०१६ मध्ये मारिन सिलिचने अँडी मरेचा लागोपाठ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले होते.
वेस्टर्न आणि साऊदर्न स्पर्धेत क्रोएशियाचा 'या' खेळाडूने पटकावले विजेतेपद
Published on

वेस्टर्न आणि साऊदर्न ओपन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात क्रोएशियाचा बोरना कोरिचने जागतिक क्रमवारीतील सातव्या क्रमांकाचा ग्रीसचा खेळाडू स्टीफानोस त्सित्सिपासचा ७-६ (७-०), ६-२ असा परा‌भव केला आणि प्रथमच रूकवूड चषक पटकाविला.

कोरिच सिनसिनाटी मास्टर्स चॅम्पियन ठरला. कोरिच हा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारा दुसरा क्रोएशियन खेळाडू ठरला. यापूर्वी २०१६ मध्ये मारिन सिलिचने अँडी मरेचा लागोपाठ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद मिळविले होते.

अंतिम सामन्यात विजयी होत पटकाविलेले कोरिचचे कारकीर्दितील तिसरे विजेतेपद पटकाविले. कोरिचने दुसऱ्या फेरीत दुसऱ्या क्रमांकाच्या राफेल नदालला तीन सेटमध्ये पराभूत केले होते.

कोरिच आणि स्टीफानोस हे तिसऱ्यांदा एकमेकांसमोर आले. कोरिचने स्टीफानोससर लागोपाठ दुसरा विजय मिळविला.

logo
marathi.freepressjournal.in