आयपीएलच्या तयारीसाठी धोनी चेन्नईमध्ये दाखल

भारताचा माजी क्रिकेटपटू तसेच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी चेन्नईत दाखल
आयपीएलच्या तयारीसाठी धोनी चेन्नईमध्ये दाखल

चेन्नई : भारताचा माजी क्रिकेटपटू तसेच चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या आगामी हंगामासाठी चेन्नईत दाखल झाला. मंगळवारी चेन्नई संघाने ट्विटरवर याविषयी चित्रफीत पोस्ट करत ‘थाला दर्शनम’ असे कॅप्शन दिले.

आयपीएलच्या १७व्या हंगामाचा थरार २२ मार्चपासून रंगणार असून सलामीच्या लढतीत गतविजेत्या चेन्नईची गाठ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी पडणार आहे. ४२ वर्षीय धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम ठरू शकतो. धोनीसह आतापर्यंत ऋतुराज गायकवाड, दीपक चहर, राजवर्धन हंगर्गेकर, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, शेख रशीद आणि निशांत सिंधू हे खेळाडू चेन्नईत दाखल झालेले असून त्यांच्या सरावाला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in