डेव्हिड वॉर्नर तब्बल ९ वर्षांनंतर बिग बॅश लीगमध्ये खेळणार

देशांतर्गत लीगमधील पुनरागमनाबाबत वॉर्नरने सांगिततले की, माझ्या मुलींना मी बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळेलेले पाहायचे होते
डेव्हिड वॉर्नर तब्बल ९ वर्षांनंतर बिग बॅश लीगमध्ये खेळणार

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू ३५ वर्षीय डेव्हिड वॉर्नर तब्बल ९ वर्षांनंतर बिग बॅश लीग (बीबीएल) खेळणार आहे. आपल्या मुलींच्या आग्रहावरून देशांतर्गत लीगमध्ये खेळण्याचा निर्णय वॉर्नर घेतला आहे. त्याने सिडनी थंडरसोबत दोन वर्षांचा करार केला. यापूर्वी तो २०१३ मध्ये या लीगमध्ये खेळला होता.

देशांतर्गत लीगमधील पुनरागमनाबाबत वॉर्नरने सांगिततले की, माझ्या मुलींना मी बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळेलेले पाहायचे होते. त्यांच्या आनंदासाठी त्यांचा आग्रह मला मोडवला नाही. वार्नर म्हणाला की, कुटुंब म्हणून बीबीएलचा भाग असणे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब असेल आणि ही गोष्ट मी त्यांच्याशी शेअर करण्यास खूप उत्सुक आहे.

दरम्यान, बिग बॅश खेळण्यासाठी वॉर्नरला यूएई लीग आयएल टी-२० लीग सोडावी लागणार आहे. दोन्ही लीगचे सामने एकाच वेळी होणार आहेत. आयएल टी-२० लीगमधील अनेक संघ आयपीएल फ्रँचायझींच्या मालकीचे आहेत. या लीगमध्ये अव्वल खेळाडूंना प्रत्येकी चार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. बिग बॅश लीगचा बारावा सीझन १३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. वॉर्नरशिवाय ट्रॅव्हिस हेड ॲडलेड स्ट्रायकर्सकडून आणि मार्नस लॅबुशेन ब्रिस्बेन हीटकडून खेळताना दिसणार आहेत.

ऑस्ट्रेलियाचे दोन आघाडीचे वेगवान गोलंदाज कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी कामाचा ताण आणि तंदुरुस्त नसल्यामुळे लीगमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in