DC vs SRH : केएल परतल्याने दिल्ली मजबूत! हैदराबादशी आज दोन हात करणार
विशाखापटणम : लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध मिळवलेला विजय आणि यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल परतल्याने दिल्ली कॅपिटल्सचे मनोबल उंचावले आहे. आयपीएलमध्ये रविवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध दिल्लीचा संघ दोन हात करणार आहे.
यंदाच्या हंगामाची शानदार सुरुवात केल्यानंतर लखनऊने हैदराबादला ५ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात हैदराबादच्या विस्फोटक फलंदाजांना ताब्यात ठेवण्यात लखनऊला यश आले.
दुसरीकडे केएल राहुल परतल्याने दिल्लीचा संघ अधिक मजबूत झाला आहे. दिल्लीने राहुलला १४ करोडला खरेदी केले आहे. मात्र नेतृत्वाची जबाबदारी घेण्यास राहुलने नकार दिला. त्यामुळे ही जबाबदारी अक्षर पटेलच्या खांद्यावर सोपवण्यात आली.
दिल्लीकडे मजबूत गोलंदाजी आक्रमण आहे. संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्व मिचेल स्टार्क करत आहेत. स्टार्क, अक्सार आणि कुलदीप यादव ही दिल्लीच्या गोलंदाजीची ताकद आहे. हैदराबादचे आक्रमण थोपवण्याची जबाबदारी यांच्या खांद्यावर असेल. स्टब्स आणि मोहित शर्मा त्यांना हातभार लावू शकतात.
हैदराबादने यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात विक्रमी २८६ धावसंख्या उभारली होती. या सामन्यात इशान किशनने ४७ चेंडूंत १०६ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने ३१ चेंडूंत ६७ धावा आणि अभिषेक शर्माने ११ चेंडूंत २४ धावा चोपल्या. ही तिकडी हैदराबादच्या गोलंदाजीची ताकद आहे. त्यांना रोखण्याचे आव्हान दिल्लीच्या गोलंदाजांसमोर असेल.
दिल्ली कॅपिटल्स
अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, कुलदीप यादव, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अजय मंडल, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, डोनोवन फरेरा, दुश्मंता चमीरा, फॅफ डुप्लेसिस, जेक फ्रेसर, करुण नायर, माधव तिवारी, मनवंथ कुमार, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, मुकेश कुमार, समीर रिझवी, टी. नटराजन, त्रिपुराना विजय, विपराज निगम.
सनरायजर्स हैदराबाद
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, ॲडम झाम्पा, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पडेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर.
वेळ : दुपारी ३.३० वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप