आज निर्णायक झुंज! मालिका विजयासाठी भारत-आफ्रिका यांना विजय अनिवार्य

भारताने पहिल्या सामन्यात ८ गडी राखून वर्चस्व गाजवले, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला.
आज निर्णायक झुंज! मालिका विजयासाठी भारत-आफ्रिका यांना विजय अनिवार्य
PM

पार्ल (दक्षिण आफ्रिका) : के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दारुण पराभव पत्करला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुरुवारी रंगणाऱ्या तिसऱ्या लढतीत विजय मिळवून मालिकेत २-१ असे यश मिळवण्यासाठी ते आतुर असतील. मात्र आफ्रिकेनेही लय मिळवल्याने हे कार्य सोपे नसेल. एकूणच बोलंड पार्क, पार्ल येथे होणाऱ्या या लढतीत चाहत्यांना दोन्ही संघांत कडवी झुंज पाहायला मिळेल.

भारताने पहिल्या सामन्यात ८ गडी राखून वर्चस्व गाजवले, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. टी-२० मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाला आता एकदिवसीय मालिकेवरही कब्जा करण्याची संधी आहे. २६ डिसेंबरपासून उभय संघांतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होईल. भारताने बोलंड पार्क येथे खेळलेले दोन्ही सामने गमावले आहेत. तसेच येथे २६० ते २७० धावसंख्याही विजयासाठी पुरेशी ठरू शकते, असे आकडेवारी दर्शवते.

आफ्रिकेचा विचार करता एडीन मार्करमच्या संघावर २०२१नंतर मायदेशात चौथी एकदिवसीय मालिका गमावण्याची नामुष्की ओढवू शकते. पहिल्या सामन्यात आफ्रिकेचा संघ ११६ धावांतच गारद झाला. दुसऱ्या सामन्यात टॉनी डी झॉर्झीचे शतक आणि नांद्रे बर्गरच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर त्यांनी मालिकेत पुनरागमन केले. आता तिसऱ्या सामन्यात ते कसा खेळ करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. डेव्हिड मिलर, हेनरिच क्लासेन यांच्याकडून आफ्रिकेला कामगिरीत सुधारणा अपेक्षित आहे.

सुदर्शन लयीत; ऋतुराजकडे लक्ष

युवा सलामीवीर साई सुदर्शनने कारकीर्दीतील पहिल्या दोन्ही टी-२० सामन्यांत अर्धशतक झळकावून लक्ष वेधले आहे. मात्र त्याचा साथीदार महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड अनुक्रमे ५ व ४ धावांवर बाद झाला आहे. त्याच्याकडून धावांची अपेक्षा आहे. तसेच रिंकू सिंग, संजू सॅमसन, तिलक वर्मा यांनी जबाबदारीने फलंदाजी करणे अपेक्षित आहे. अर्शदीप सिंग व आवेश खान यांची वेगवान जोडी दमदार कामगिरी करत आहे. त्यांना कुलदीप यादव व अक्षर पटेल या फिरकीपटूंची साथ लाभेल.

८-६ बोलंड पार्क येथे झालेल्या १४ एकदिवसीय सामन्यांपैकी ८ वेळा प्रथम फलंदाजी करणारा, तर ६ वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे.

 संघ -दक्षिण आफ्रिका : एडीन मार्करम (कर्णधार), ओटनेल बार्टमन, नांद्रे बर्गर, टॉनी डी झॉर्झी, रीझा हेंड्रिक्स, हेनरिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली पोंगवाना, वियान मल्डर, अँडीले फेहलुकवायो, रासी व्हॅन डर दुसेन, तबरेझ शम्सी, कायले वॅरेन, लिझाड विल्यम्स.

logo
marathi.freepressjournal.in