वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये किदांबी श्रीकांत पराभूत; लक्ष्यची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

राष्ट्रकुल खेळातील चॅम्पियन लक्ष्य सेनने ७२ मिनिटांत २१-१७, २१-१० असा विजय मिळविला
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये किदांबी श्रीकांत पराभूत; लक्ष्यची प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक

खिलाडूवृत्ती : किदांबी श्रीकांतचा चीनच्या झाओ जून पेंगकडून ३४ मिनिटांत १८-२१, १७-२१ असा पराभव झाला. श्रीकांतने खिलाडूवृत्ती दाखवत विजेत्याचे अिभनंदन केले.

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने स्पेनच्या लुईस पेनावेरला सरळ गेममध्ये नमवून वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. राष्ट्रकुल खेळातील चॅम्पियन लक्ष्य सेनने ७२ मिनिटांत २१-१७, २१-१० असा विजय मिळविला. दरम्यान, किदांबी श्रीकांतचा चीनच्या झाओ जून पेंगकडून ३४ मिनिटांत १८-२१, १७-२१ असा पराभव झाला.

एका क्षणी ३-४ असा पिछाडीवर असूनही नवव्या मानांकित लक्ष्य सेनने जोरदार मुसंडी मारत सहा गुण वसूल करून १३-७ अशी आघाडी घेतली. हीच लय टिकवून ठेवत त्याने पहिला गेम जिंकला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या लक्ष्यने दुसऱ्या गेममध्येही आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला डोके वर काढण्याची कोणतीही संधी दिली नाही.

याआधी, एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला पुरुष दुहेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला; परंतु महिला गटात अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांचा दुसऱ्या फेरीत पराभव झाल्याने त्यांना गाशा गुंडाळावा लागला.

अर्जुन आणि कपिला या बिगरमानांकित जोडीला डेन्मार्कच्या आठव्या मानांकित किम एस्ट्रूप आणि ॲन्डर्स स्कारूप रासमुसेन जोडीने दुसऱ्या फेरीत २१-१७, २१-१६ ने पराभूत केले. आता त्यांचा मुकाबला सिंगापूरच्या ही योंग काई टेरी आणि लोह कीन हीन या जोडीशी होईल.

पोनप्पा आणि सिक्की यांना अव्वल मानांकित चीनच्या चेन किंग चेन आणि जिया यि फान यांनी ४२ मिनिटांत २१-१५, २१-१० असे पराभूत केले.

पूजा डांडु आणि संजना संतोष जोडीला तिसऱ्या मानांकित कोरियाच्या ली सो ही और शिन सियुंग चान जोडीने पराभूत केले.

सायना नेहवालची आगेकूच सुरू

लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने यंदा आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात करताना महिला एकेरीच्या गटात विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूच्या माघारीमुळे तिला पुढे चाल मिळाली. भारताच्या ३२ वर्षीय सायनाने सलामीच्या सामन्यात हाँगकाँगच्या चेऊंग ननाग यी हिला ३८ मिनिटांत २१-१९, २१-९ ने मात दिली. दुसऱ्या फेरीत प्रवेश जपानची माजी चॅम्पियन ओकुहाराने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे सायनाला पुढे चाल मिळाली. तिला प्री-क्वार्टर फायनलमधील प्रवेश निश्चित करता आला. महिला एकेरीत सायना ही भारताची एकमेव खेळाडू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in