IPL 2023 : पंतच्या अनुपस्थितीत 'या' खेळाडूकडे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद

आगामी आयपीएलच्या १६व्या (IPL 2023) हंगामात दिल्ली कॅपिटल्स ((Delhi Capitals)) संघाने या भारतीय खेळाडूचे प्रमोशन करत दिली मोठी जबाबदारी
IPL 2023 : पंतच्या अनुपस्थितीत 'या' खेळाडूकडे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद
Published on

काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलदांज रिषभ पंतचा (Rishabh Pant) भीषण अपघात झाला होता. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली होती. अद्यापही तो पूर्णपणे बरा झाला नसून आगामी आयपीएल २०२३ (IPL 2023) स्पर्धेत तो गैरहजर असणार हे निश्चित आहे. अशामध्ये आता दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी ही ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरकडे (David Warner) देण्यात आली आहे. तसेच, या संघात असलेला अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला (Axar Patel) उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिषभ पंत हा पूर्णपणे बरा झाला नसून दिल्ली कॅपिटल्सने नवा कर्णधार आणि उपकर्णधाराची निवड केली आहे. कर्णधार म्हणून अनुभवी डेव्हिड वॉर्नरची निवड करण्यात आली आहे. तर, अष्टपैलू अक्षर पटेलचे प्रमोशन करत उपकर्णधार पद देण्यात आले आहे. गेल्या आयपीएल २०२२मध्ये रिषभ पंतच्या नेतृत्वात संघाने १४ सामन्यात ७ सामने जिंकले होते. तर, ७ सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यावेळेस ५व्या स्थानावर होता. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या आयपीएलच्या १६व्या हंगामात हा संघ काय कमाल करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

logo
marathi.freepressjournal.in