भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभुषण शरण सिंह यांना कोर्टाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना कोर्टात हजर रहावं लागणार आहे. ब्रिजभुषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाप्रकरणी हे समन्स बजावलं गेलं आहे. सहा महिला कुस्तीगिरांनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. १८ जुलै रोजी त्यांना कोर्टात हजर रहावं लागणार आहे.
राऊज एव्हेन्यू कोर्टाने WFI चे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना देखील समन्स बजावला आहे. ब्रिजभूषण यांच्यावर लावलेली कलमं हे सगळे गंभीर अपराध आहेत. यात कलम ३५४ चा देखील समावेश आहे. ज्यासाठी कमीत कमी शिक्षेची तरतूद ही पाच वर्ष आहे. एक एक कलम असं आहे, ज्यात जामीन मिळत नाही. कोर्टाने दिल्ली पोलिसांकडे या प्रकरणात सीडीआर रिपोर्ट आणि FSL रिपोर्ट दाखल करण्यास सांगितलं आहे. तसंच काही विदेशात राहणाऱ्या लोकांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहेत. तसंच इतर तपासासंदर्भातील अहवाल कोर्टात सादर करा, असं देखील कोर्टाने स्पष्ट केलं आहे. दिल्ली पोलिसांनी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचं कोर्टात सांगितलं आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोप
ब्रिजभूषण शरण सिंह यांना भारती कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात यावं यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर जानेवारी महिन्यात कुस्तीगिरांनी आंदोलन सुरु केलं होतं. त्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा आंदोल करत ब्रिजभूषण यांच्यावर FIR दाखल करण्याची मागी केली. सर्वोच्च न्यायायलाने या प्रकरणात लक्ष घातल्याने FIR दाखल झाली मात्र, ब्रिजभूषण यांना अटक झाली नाही. यानंतर हे आंदोलन चिघळलं होतं. शेवटी केंद्र सरकारने मध्यस्थी केल्यानंतर कुस्तीपटूंनी मैदानातून माघार घेतली. आता या सर्व आरोपांप्रकरणी ब्रिजभूषण यांना १८ जुलै रोजी कोर्टात हजर रहावं लागणार आहे.