चेन्नईला विजय मिळवून देणाऱ्या जडेजाला धोनीने घेतले उचलून; व्हिडिओ व्हायरल

चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनी डोळे मिटून विजयासाठी प्रार्थना करताना दिसून येत होता.
चेन्नईला विजय मिळवून देणाऱ्या जडेजाला धोनीने घेतले उचलून; व्हिडिओ व्हायरल

आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील महाअंतिम सामना गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर काल (29 मे) रात्री पार पडला. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने गुजरात टायटन्सचा पाच विकेट्सने पराभव करत 2023 च्या विजेते पदावर आपलं नाव कोरलं. हा सामना अत्यंत थरारक असा झाला. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावांची गरज होती. अशा परिस्थितीत चेन्नईचे सर्व चाहते श्वास रोखून होते. चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनी डोळे मिटून विजयासाठी प्रार्थना करताना दिसून येत होता.

अत्यंत अटी-तटीच्या या सामन्यात शेवटच्या दोन चेंडून दहा धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने शेवट्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. तरीदेखील शेवट्या चेंडूवर चार धावांची आश्वकता होती. अशात जडेजाने शेवटच्या चेंडूवर देखील चौकार मारत चेन्नईला विजय मिळवून दिला. जडेजा शेवटचा चेंडू खेळत असताना धोनी मात्र डोळे मिटून प्रार्थना करत होता. विजयी होऊन जडेजा जेव्हा धोनी जवळ पोहचला त्यावेळी माहीने त्याला उचलले आणि एकच जल्लोष केला.

मोहीत शर्माच्या षटकात पहिल्या चार चेंडूत फक्त दोन धावा आल्या होता. आता विजयासाठी शेवटच्या दोन चेंडून दहा धावा हव्या होत्या. अशात सर जडेजाने एक षटकार आणि एक चौकारच्या मदतीने चैन्नई संघाला पाचव्यांदा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं. यानंतर जडेजाने पव्हेलियनकडे धाव घेतली आणि थेट धोनीला गाठलं. यानंतर धोनीने भावूक होत त्याला मिठी मारली आणि त्याला उचलून घेतलं. आयपीएलने धोनी आणि जडेजा यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in