ध्रुव जुरेलच्या नाबाद ९९ धावा, देवदत्त पडिक्कलचेही अर्धशतक; न्यूझीलंड 'अ'विरुद्ध भारत 'अ'ची ७ बाद २९१ धावांपर्यंत मजल

कर्णधार ध्रुव जुरेलच्या नाबाद ९९ धावा आणि देवदत्त पडिक्कलच्या धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर ८० भारत 'अ' संघाने न्यूझीलंड 'अ'विरुद्धच्या चारदिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी ७ बाद २९१ धावा उभारल्या. शनिवारी येथे खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय संघाची सुरुवात समाधानकारक झाली होती. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर जुरेलने डाव सावरला.
ध्रुव जुरेलच्या नाबाद ९९ धावा, देवदत्त पडिक्कलचेही अर्धशतक; न्यूझीलंड 'अ'विरुद्ध भारत 'अ'ची ७ बाद २९१ धावांपर्यंत मजल
ध्रुव जुरेलच्या नाबाद ९९ धावा, देवदत्त पडिक्कलचेही अर्धशतक; न्यूझीलंड 'अ'विरुद्ध भारत 'अ'ची ७ बाद २९१ धावांपर्यंत मजल
Published on: 

ख्राइस्टचर्च : कर्णधार ध्रुव जुरेलच्या नाबाद ९९ धावा आणि देवदत्त पडिक्कलच्या धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर ८० भारत 'अ' संघाने न्यूझीलंड 'अ'विरुद्धच्या चारदिवसीय सामन्याच्या पहिल्या दिवशी ७ बाद २९१ धावा उभारल्या. शनिवारी येथे खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय संघाची सुरुवात समाधानकारक झाली होती. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर जुरेलने डाव सावरला.

दिवसअखेर जुरेल १५५ चेंडूंत ९९ धावांवर, तर आकाश दीप २५ धावांवर खेळत होता. आठव्या विकेटसाठी या जोडीने १८.४ षटकांत ६९ धावांची भागीदारी करून भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. पहिल्या सत्रात भारताने एक गडी गमावून ८७ धावा केल्या होत्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालला वेगवान गोलंदाज फ्रेझर शीटने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर पायचीत केले.

मात्र, दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात भारताला साई सुदर्शनच्या रूपाने दुसरा धक्का बसला. त्याने वेगवान गोलंदाज जॅरॉड मॅकेच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारला. यष्टीरक्षक मिचेल हे याने त्याचा झेल टिपला. सुदर्शनने ४१ धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला पडिक्कलने संयम कायम राखत फलंदाजी सुरू ठेवली. मॅकेच्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने चौकार मारत त्याने १०१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यावेळी भारताची धावसंख्या दोन बाद १३१ अशी होती. मात्र, त्यानंतर अवघ्या सात धावांत भारताने तीन फलंदाज गमावले.

एका बाजूने विकेट पडत असताना जुरेलने मात्र संयमी फलंदाजी केली. त्याला मानव सुतारने चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना रोखून धरले. जुरेलने ९३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)