"मुलीपासून दूर राहणे अवघड, पण..."; ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करण्यास दीपिका कुमारी सज्ज

एकीकडे दीड वर्षाची मुलगी आणि दुसरीकडे ऑलिम्पिक पदकाची आकांक्षा, अशा कात्रीत भारताची तिरंदाज दीपिका कुमारी अडकली आहे. मात्र...
"मुलीपासून दूर राहणे अवघड, पण..."; ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करण्यास दीपिका कुमारी सज्ज
Published on

नवी दिल्ली : एकीकडे दीड वर्षाची मुलगी आणि दुसरीकडे ऑलिम्पिक पदकाची आकांक्षा, अशा कात्रीत भारताची तिरंदाज दीपिका कुमारी अडकली आहे. मात्र, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून ऑलिम्पिकमध्ये यशस्वी कामगिरी करण्यास दीपिका सज्ज झाली आहे.

“मुलीपासून दूर राहण्याचे दु:ख शब्दांत मांडणे खूप अवघड आहे. मात्र, ऑलिम्पिक पदकही मला खुणावत आहे. यासाठी मी खूप वर्षे मेहनत घेतली आहे. पॅरिसला रवाना होण्यापूर्वी मी पती अतानू दासच्या साथीने मुलगी वेदिकाला पुण्यातील लष्कराच्या क्रीडा केंद्रात बरोबर घेऊन आले. या वेळी माझ्यापेक्षा मुलीने दाखवलेला संयम महत्त्वाचा होता. पती अतानू आणि माझ्या सासरच्यांशी तिने छान जुळवून घेतले आहे. त्यामुळेच मी निर्धास्त होऊन ऑलिम्पिकसाठी येऊ शकले,” असे दीपिका म्हणाली. २६ जुलैपासून ऑलिम्पिकला सुरूवात होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in