Dinesh Karthik: दिनेश कार्तिक बंगळुरूचा फलंदाजी प्रशिक्षक

भारताचा निवृत्ती क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
Dinesh Karthik: दिनेश कार्तिक बंगळुरूचा फलंदाजी प्रशिक्षक
Published on

बंगळुरू : भारताचा निवृत्ती क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कार्तिकला मार्गदर्शकाची भूमिकाही आगामी हंगामात बजवावी लागणार आहे.

बंगळुरूला २०२४च्या आयपीएलमध्ये एलिमिनेटर लढतीत पराभव पत्करावा लागला. मात्र एकवेळी ८ पैकी ७ सामने गमावले असूनही सलग ६ लढती जिंकून बंगळुरूने बाद फेरी गाठण्याचा पराक्रम केला. ३९ वर्षीय कार्तिकने या स्पर्धेत ३६च्या सरासरीने ३२६ धावा केल्या. आयपीएल संपल्यावर कार्तिकने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली. “कार्तिक पुन्हा बंगळुरूकडे परतला आहे. आगामी आयपीएलमध्ये कार्तिक बंगळुरूचा फलंदाजी प्रशिक्षक तसेच मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे,” असे बंगळुरूने ट्वीट केले. कार्तिकनेसुद्धा याविषयी आभार मानले. “कारकीर्दीतील नवा अध्याय सुरू करण्यासाठी मी आतुर आहे. क्रिकेटपटू म्हणून माझा अनुभव यासाठी वापरण्याचा प्रयत्न करेन,” असे कार्तिकने ट्वीट केले.

logo
marathi.freepressjournal.in