जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा: स्वप्निल वाघमारे ठरला कल्याण श्री

ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत १००हून अधिक खेळाडू सहभागी झाले.
 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा: स्वप्निल वाघमारे ठरला कल्याण श्री

ठाणे : रिक्रिएशन व्यायामशाळेने उदयकुमार दिवाडकर व नाना फडके यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कळव्यातील अपोलो जिमच्या स्वप्निल वाघमारेने ‘कल्याण श्री’ किताबाचा मान मिळवला. त्याने दया जिमच्या मोनीश कारभारीवर सरशी साधली.

ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेत १००हून अधिक खेळाडू सहभागी झाले. दया जिमने १५ गुणांसह सांघिक जेतेपद पटकावले. मसल हंट १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक म्हणून ऑलिम्पिया जिमच्या यश दळवीची निवड करण्यात आली. मसल हंटच्या वामन वाकडेला सर्वोत्तम पिळदार शरीरयष्टीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विविध गटातील विजेते

शॉर्ट गट : स्वप्निल वाघमारे (अपोलो जिम), मोनीश कारभारी (दया जिम), सतीश पुजारी (नव महाराष्ट्र जिम)

मिडीयम गट : वामन वाकडे (मसल हंट), राजकुमार पाटील (शाहू जिम आणि फिटनेस सेंटर), मयुर कारभारी (मसल हंट)

टॉल गट : मंगेश पाटील (दया जिम), पराग माने (मॉन्स्टर फॅक्टरी), अतुल अधिकारी (तरणे फिटनेस)

सुपर टॉल गट : आशिष व्यवहारे (ओम महारुद्र व्यायामशाळा), प्रकाश मोरे (श्री मावळी मंडळ), यश दळवी (ऑलिम्पिया जिम)

logo
marathi.freepressjournal.in