जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा :अमर क्रीडा, अंकुर स्पोर्ट्स, शिवनेरी सेवा, लायन्स क्लब उपांत्यपूर्व फेरीत

शिवशक्ती संघाने विजय बजरंगचा प्रतिकार २५-२२ असा मोडीत काढला. अभिषेक कोरे, साई चौगुले यांच्या चढाया व संतोष वारकरीच्या पकडींमुळे त्यांनी विजय मिळवला.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा :अमर क्रीडा, अंकुर स्पोर्ट्स, शिवनेरी सेवा, लायन्स क्लब उपांत्यपूर्व फेरीत
Published on

मुंबई : विजय नवनाथ मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरुषांच्या प्रथम श्रेणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती क्रीडा, गोल्फादेवी सेवा, सुनील स्पोर्ट्स आणि विजय क्लब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवरशेजारील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत गोल्फादेवीने यंग प्रभादेवीला ३७-३३ असे पराभूत केले. धनंजय सरोज व सनी कोळी यांनी चढाई-पकडींमध्ये छाप पाडली. सुनील स्पोर्ट्सने बंड्या मारुती संघाला ३५-२३ अशी धूळ चारली. रोहन जाधव, शोएब मुल्ला, जय बागल या त्रिकुटाने चमक दाखवली.

शिवशक्ती संघाने विजय बजरंगचा प्रतिकार २५-२२ असा मोडीत काढला. अभिषेक कोरे, साई चौगुले यांच्या चढाया व संतोष वारकरीच्या पकडींमुळे त्यांनी विजय मिळवला. विजय क्लबने साऊथ कॅनराला ३८-२८ असे नमवले. राज नाटेकर, रोहन तिवारी, विजय दिवेकर यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते.

logo
marathi.freepressjournal.in