जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा: दादरचा विजय क्लब अजिंक्य

स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा: दादरचा विजय क्लब अजिंक्य

मुंबई : विजय नवनाथ मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरुषांच्या प्रथम श्रेणी गटात दादरच्या विजय क्लबने विजेतेपद मिळविले. विजय क्लबचा राज नाटेकर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित करण्यात आले.

सेनापती बापट मार्ग,लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारील मैदानात संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात विजय क्लबने अंकुर स्पोर्ट्सचा प्रतिकार २७-२२ असा मोडून काढत २१ हजार व चषक पटकावला. अंकुर संघाला १५ हजार व चषक देण्यात आला. विजयचे या हंगामातील हे दुसरे जिल्हास्तरीय अजिंक्यपद ठरले. राज नाटेकरच्या धूर्त चढाया त्याला विजय दिवेकरची मिळालेली पकडीची साथ यामुळेच विजय क्लब हे यश मिळवू शकले. अंकुरकडून सिद्धेश तटकरेने कडवी झुंज दिली. अभिमन्यू पाटील व सिद्धेश स्पर्धेतील सर्वोत्तम चढाईपटू व पकडपटू ठरले. त्या दोघांना प्रत्येकी रिफ्रजेटर देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in