जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा; शितो रियू अकादमीच्या खेळाडूंची छाप

जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत या अकादमीच्या पाच जणांनी अग्रस्थान पटकावले.
जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धा;
शितो रियू अकादमीच्या खेळाडूंची छाप
PM

मुंबई : शितो रियू स्पोर्ट्स  कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या (एसएसकेकेए) खेळाडूंनी जिल्हास्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत या अकादमीच्या पाच जणांनी अग्रस्थान पटकावले.

संघाचे प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच उमेश मुरकर, विघ्नेश मुरकर, भूपेश वैती, विन्स पाटील, आशिष महाडिक, अश्विनी जांबळे, राहुल साळुंखे आणि विघ्नेश कोनार यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी हे यश साध्य केले. गंगाधर बुडमलाने ४५ किलो वजनी गटात जेतेपद मिळवले. त्याशिवाय प्रज्ञेश पटवर्धन (६५ किलो), अनिकेत जैस्वार (५० किलो), आलोक ब्रीद (५५ किलो), दुर्वा गावडे (५५ किलो) यांनी आपापल्या गटात अग्रस्थान काबिज केले.

त्याशिवाय ग्रिशम पटवर्धन, प्रिया दास यांनी अनुक्रमे २८ व ६५ किलो वजनी गटात द्वितीय, तर अरहान खान, मानसी पटवा, कशिश जैस्वार यांनी आपालल्या वजनी गटात तिसरे स्थान प्राप्त केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in