जोकोव्हिच, सिनर, गॉफ, सबालेंका उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा

सर्बियाचा अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, इटलीचा चौथा मानांकित जॅनिक सिनर हे दोघे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येतील.
जोकोव्हिच, सिनर, गॉफ, सबालेंका उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा

मेलबर्न : सर्बियाचा अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, इटलीचा चौथा मानांकित जॅनिक सिनर हे दोघे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येतील. तसेच महिलांमध्ये अमेरिकेची चौथी मानांकित कोको गॉफ आणि बेलारूसची दुसरी मानांकित आर्यना सबालेंका यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या जोकोव्हिचने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत अमेरिकेच्या १२व्या मानांकित टेलर फ्रिट्झला ७-६ (७-३), ४-६, ६-२, ६-३ असे चार सेटमध्ये नमवले. रॉड लेव्हर एरिनावरील हा सामना जोकोव्हिचने ३ तास, ४५ मिनिटांच्या संघर्षानंतर जिंकला. दुसरीकडे सिनरने रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हवर ६-४, ७-६ (७-५), ६-३ अशी मात केली. त्यामुळे शुक्रवारी या दोघांमधील उपांत्य लढत रंगतदार होऊ शकते.

महिलांमध्ये किशोरवयीन गॉफने मार्टा कोस्तूकवर ७-६ (८-६), ६-७ (३-७), ६-२ अशी तीन सेटमध्ये सरशी साधली. तिची आता सबालेंकाशी गाठ पडेल. सबालेंकाने नवव्या मानांकित बार्बोरा क्रेजिकोव्हाला ६-२, ६-३ अशी सहज धूळ चारली. पुरुष दुहेरीत बुधवारी भारताचा रोहन बोपण्णा त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एब्डनसह उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in