दबाव जाणवत असेल तर आयपीएल खेळू नका;कपिलदेव यांचे रोखठोक मत

कपिलदेव यांनी सध्याची स्पर्धात्मकता आणि ते खेळत असतानाचे जुने दिवस यांची तुलना करण्याचा प्रयत्न केला
दबाव जाणवत असेल तर आयपीएल खेळू नका;कपिलदेव यांचे रोखठोक मत
Published on

दबाव जाणवत असेल तर क्रिकेटपटूंनी आयपीएल खेळू नये, असे रोखठोक मत माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केले.

‘आकाश बायजू ’ या शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या ‘चॅम्पियन्स ऑफ आकाश २०२२’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कपिलदेव बालत होते. यावेळी कपिलदेव यांनी सध्याची स्पर्धात्मकता आणि ते खेळत असतानाचे जुने दिवस यांची तुलना करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, 'मी सध्या टीव्हीवर सातत्याने ऐकतो की आमच्यावर खूप दबाव आहे. आम्ही आयपीएल खेळत आहोत. तेथे खूप दबाव असतो. यावर मी एकच गोष्ट सांगू इच्छितो खेळू नका. जर खेळण्याची तीव्र इच्छा असेल तर दबाव असूच शकत नाही.'

ते पुढे म्हणाले की, 'दबाव, डिप्रेशन हे अमेरिकेतून आलेले शब्द आहेत. मला हे कधी समजलेच नाहीत. मी शेतकरी कुटुंबातून येतो. आम्ही आनंदासाठी खेळलो. जिथे आनंद आहे तिथे दबाव असूच शकत नाही.'

logo
marathi.freepressjournal.in