सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; माद्रिद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

माद्रिद : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने गुरुवारी माद्रिद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामुळे सिंधूच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा बळावल्या आहेत.

जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या सिंधूने चायनीज तैपईच्या हुआंग सेनवर २१-१४, २१-१२ असे प्रभुत्व मिळवून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. २०२३पासून सिंधूला एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मात्र एप्रिलअखेरीस क्रमवारीत अव्वल १६ खेळाडूंत टिकून राहिल्यास ती पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकते. २६ जुलैपासून ऑलिम्पिकला प्रारंभ होईल.

सिंधूने ३६ मिनिटांत हुआंगला धूळ चारली. सिंधूसमोर आता थायलंडची सुपानिदा किंवा जपानची निडायरा यांच्यापैकी एकीचे आव्हान असेल. २०२३मध्ये सिंधूने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिला जेतेपदाने हुलकावणी दिलेली. त्यामुळे सिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. २०२२मध्ये सिंगापूर ओपनच्या स्वरूपात सिंधूने अखेरची स्पर्धा जिंकली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in