ड्रीम११ चषक क्रिकेट स्पर्धा; गणेश पालकर क्रिकेट क्लब अजिंक्य

गणेश पालकर क्रिकेट क्लबने डॅशिंग स्पोर्ट्स क्लबचा ९ गडी राखून धुव्वा उडवत ड्रीम११ चषक क्रिकेट स्पर्धेचे (११ वर्षांखालील) विजेतेपद मिळवले.
ड्रीम११ चषक क्रिकेट स्पर्धा; गणेश पालकर क्रिकेट क्लब अजिंक्य
Published on

मुंबई : गणेश पालकर क्रिकेट क्लबने डॅशिंग स्पोर्ट्स क्लबचा ९ गडी राखून धुव्वा उडवत ड्रीम११ चषक क्रिकेट स्पर्धेचे (११ वर्षांखालील) विजेतेपद मिळवले. विजेत्यांना भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.

ओव्हल मैदान, चर्चगेट येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डॅशिंग क्लबचा डाव १८.३ षटकांत ८५ धावांतच आटोपला. फाहर शेखने ३, तर अंकित म्हात्रेने दोन बळी मिळवले. ख्रिस्तियानो बुटेल्होने त्यांच्याकडून सर्वाधिक २१ धावा केल्या. मग अंकित (नाबाद ४६) व अरिश खान (नाबाद २३) यांच्या फलंदाजीमुळे पालकर क्लबने १२.३ षटकांतच एका फलंदाजाच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. अंकित सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. २१ षटकांच्या या स्पर्धेत १२ संघांचा सहभाग होता.

“जीवनात कुठलेही क्षेत्र निवडा. ते जर तुमच्या आवडीचे क्षेत्र असेल, तर त्यात तुम्ही आनंद मिळवाल व यशस्वी व्हाल. त्यामुळे क्रिकेट खेळतानाही या खेळाचा आनंद लुटा,” असा सल्ला वेंगसरकर यांनी यावेळी युवा खेळाडूंना दिला.

logo
marathi.freepressjournal.in