दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा: भारत-ड संघाला नमवून क-संघ अग्रस्थानी

Duleep Trophy Cricket Tournament: डावखुरा फिरकीपटू मानव सुतारने दुसऱ्या डावात मिळवलेल्या ७ बळींच्या जोरावर भारत-क संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-ड संघाला ४ गडी राखून नमवले.
दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा: भारत-ड संघाला नमवून क-संघ अग्रस्थानी
@CRICINSAAN/X
Published on

बंगळुरू : डावखुरा फिरकीपटू मानव सुतारने दुसऱ्या डावात मिळवलेल्या ७ बळींच्या जोरावर भारत-क संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-ड संघाला ४ गडी राखून नमवले. या विजयासह भारत-क संघाने गुणतालिकेत अग्रस्थान मिळवले.

पहिल्या डावात भारत-ड १६४, तर भारत-क संघ १६८ धावांत गारद झाला. दुसऱ्या डावात मग भारत-ड संघाने २३६ धावा करून भारत-क संघापुढे २३३ धावांचे लक्ष्य ठेवले. मानवने याच डावात सात बळी मिळवताना देवदत्त पडिक्कल (५६), श्रेयस अय्यर (५४) यांचे बळी मिळवले. मग आर्यन जुयाल (४७), रजत पाटिदार (४४) व कर्णधार ऋतुराज गायकवाड (४६) यांनी उपयुक्त योगदान देत अखेरच्या दिवशी भारत-क संघाचा विजय साकारला.

logo
marathi.freepressjournal.in