

मुंबई : अनुभवी सलामीवीर के. एल. राहुल, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील नायक देवदत्त पडिक्कल आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना चेन्नई येथे ६ सप्टेंबरपासून पूर्व विभागाविरुद्ध होणाऱ्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाकडून खेळण्यास सांगण्यात आले आहे.
भारतीय टी-२० संघात समाविष्ट असलेल्या दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्मा, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि यष्टीरक्षक इशान किशन यांच्या या सामन्यातील सहभागाबाबतचा निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मंजुरीवर अवलंबून असेल. राष्ट्रीय निवडकर्त्यांची इच्छा आहे की, जे भारतीय खेळाडू सध्या मोकळे आहेत त्यांनी दिलीप ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला पाहिजे.
राहुल, पडिक्कल, सिराज हे तिघे २७ ऑगस्ट रोजी शेवटचा सामना खेळले होते आणि आता ते २७ सप्टेंबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत थेट खेळतील. भारताची अफगाणविरुद्ध १३ तारखेपासून टी-२० मालिका असल्याने तिलक, किशन, वैभव अंतिम सामना खेळणे कठीण दिसते.