डायनॅमिक खो-खो लीग; माहीम वॉरियर्ससमोर वरळी फिनिशर्स निष्प्रभ,दादर पँथर्सची माटुंगा फायटर्सवर सरशी

दादरच्या अमर हिंद मंडळातर्फे आयोजित डायनॅमिक खो-खो लीगमध्ये बुधवारी माहीम वॉरियर्स, दादर पँथर्स, परेल रुद्रास या संघांनी दमदार विजय नोंदवले.
डायनॅमिक खो-खो लीग; माहीम वॉरियर्ससमोर वरळी फिनिशर्स निष्प्रभ,दादर पँथर्सची माटुंगा फायटर्सवर सरशी

मुंबई : दादरच्या अमर हिंद मंडळातर्फे आयोजित डायनॅमिक खो-खो लीगमध्ये बुधवारी माहीम वॉरियर्स, दादर पँथर्स, परेल रुद्रास या संघांनी दमदार विजय नोंदवले. वरळी फिनिशर्स, माटुंगा फायटर्स व लालबाग स्पार्ट्न्स संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

अमरवाडी मैदान, गोखले रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ड्रीम रनमुळे सामने रंगतदार होत आहे. गुणतालिकेत १२ गुणांसह आघाडीवर असलेल्या माहीम वॉरियर्सने वरळी फिनिशर्सवर १९-१७ अशी मात केली. माहीमने चौथ्या टर्नमध्ये ६ ड्रीम रन केले. त्यांच्यासाठी जर्नादन सावंतने ४.०५ मिनिटे संरक्षण केले. तसेच रोहन टेमकर (२.१० मि.), आयुष गुरव (१.२० मि.) यांनीही लक्ष वेधले. वरळीकडून शुभम शिंदे (२.३० मि.) उत्तम खेळला.

दुसऱ्या सामन्यात दादर पँथर्सने माटुंगा फायटर्सवर १९-१५ असा विजय मिळवला. प्रतिक होडावडेकरने २.३० मिनिटे संरक्षण केले. त्याला प्रतीक घाणेकर (३.४० मि.), अक्षय खापरे (१.३० मि., ५ गडी) यांची उत्तम साथ लाभली. अन्य लढतीत परेल रुद्रासने लालबाग स्पार्ट्न्सला २०-१६ असे नमवले. हितेश आग्रे (२.३५ मि., २ गडी), तेजस सनगरे (१.१० मि., ३ गडी) यांनी अष्टपैलू खेळ केला. लालबागकडून श्रेयस राऊल व हर्ष कामतेकर यांनी कडवा प्रतिकार केला, मात्र ते संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in