टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणीवर भर, कसोटी मालिका आजपासून सुरू होणार

या मालिकेद्वारे रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.
 टी-२० विश्वचषकासाठी संघबांधणीवर भर, कसोटी मालिका आजपासून सुरू होणार
Published on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका संपल्यांनतर आता गुरूवारी ७ जुलैपासून टी-२० मालिका सुरू होणार आहे. सामन्यांमध्ये निरनिराळे प्रयोग करून संघाची क्षमता आजमावण्याऐवजी आता टी-२० विश्वचषकासाठी सर्वोत्तम ११ खेळाडूंचा संघ तयार करण्यावर भर दिला जाण्याचे प्रयत्न अपेक्षित आहेत.

या मालिकेमध्ये तीन सामने होणार आहेत. या मालिकेद्वारे रोहित शर्मा भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. रोहित तब्बल ११२ दिवसांनी खेळणार आहे. १४ मार्च रोजी त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. रोझ बाउल क्रिकेट ग्राउंडवर गुरुवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात तो इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरपुढे तो उभा ठाकणार आहे.

पहिल्या टी-२० मध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे. या सामन्यात राहुल द्रविड संघासोबत नसेल. एजबॅस्टन कसोटीनंतर अवघ्या दोन दिवसांनी पहिला टी-२० असल्याने या सामन्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराहदेखील पहिल्या टी-२० मध्ये खेळणार नाहीत.

रोझ बाउल क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत एकूण नऊ टी-२० सामने झाले आहेत. पाच वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे, तर चार वेळा लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरला आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६८, तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १४३ आहे. खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाची करण्याचा निर्णय व्यवहार्य ठरण्याची शक्यता आहे. १९० किंवा दोनशे धावसंख्या उभारून प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणता येऊ शकतो, असे बोलले जात आहे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या दीडशेच्या आसपास रोखण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सॉउथम्पटनमध्ये गुरुवारी जोरदार पावसाची कोणतीही शक्यता नाही. आकाश मेघाच्छादित राहणार आहे.

हलक्या दरी कोसळल्या, तरी सामन्यावर त्याचा विपरित परिणाम होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. तापमान २० ते २४ ॲश सेल्सियस इतके राहील, असा अंदाज आहे.

logo
marathi.freepressjournal.in