दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात

विजयासाठी बेन फोक्सने (१५ चेंडूंत नाबाद १२ धावा) बेन स्टोक्सला मोलाची साथ दिली.
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात

मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने न्यूझीलंडवर पाच गडी राखून मात केली. विजयासाठीचे २९९ धावांचे लक्ष्य इंग्लंडने ५० षटकांत पाचगडी बाद २९९ धावा करीत साध्य केले. सलामीवीर ॲलेक्स लीसने (८१ चेंडूंत ४४ धावा) केल्या. त्यांनर ९३ धावांतच चार फलंदाज बाद झाल्यानंतर जॉनी बेअरस्टो (९२ चेंडूंत १३६ धावा) आणि कर्णधार बेन स्टोक्स (७० चेंडूंत नाबाद ७५ धावा) यांनी डाव सावरण्याचा नेटाने प्रयत्न करण्याबरोबर इंग्लंडला विजयपथावर नेऊन सोडले. विजयासाठी बेन फोक्सने (१५ चेंडूंत नाबाद १२ धावा) बेन स्टोक्सला मोलाची साथ दिली.

न्यूझीलंडचा पहिला डाव ५५३ धावांत संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ५३९ धावा केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात १४ धावांची नाममात्र आघाडी मिळाली होती. न्यूझीलंडचा दुसरा डाव ८४.४ षटकांत २८४ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला विजयासाठी चौथ्या डावात २९९ धावा करण्याचे आव्हान मिळाले.

निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात इंग्लंडला जबरदस्त धक्का बसला. सलामीवीर झॅक क्रॉली चार चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल टीम साऊथीने टिपला.ओली पोपला फार काही करता आले नाही. पंधराव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मॅट हेन्रीने त्याला ब्लंडेलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. पोपने ३४ चेंडूंत १८ धावा केल्या. बोल्टने मग पहिल्या डावातील शतकवीर जो रूटला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत अवघ्या तीन धावांवर माघारी पाठविले.

अॅलेक्स लीसचाही संयम मग सुटला. साऊथीच्या गोलंदाजीवर त्याचा झेल उडाला. ब्लंडेलने कोणतीही चूक न करता हा झेल टिपला. त्यामुळे २५.२ षटकांत इंग्लंडची अवस्था ४ बाद ९३ अशी झाली.

त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्यावर विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी डाव सावरण्याचीच जबाबदारीच येऊन पडली. या दोघांनी दमदार भागीदारी करताना विजयी लक्ष्याचेही भान ठेवले.

इंग्लंडने उपाहारापर्यंत ९ षटकांत १ बाद ३६ धावा केल्या. चौदाव्या षटकातील पहिल्या चेंडूवर इंग्लंडचे अर्धशतक फलकावर लागले, तर २८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शतक झळकले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in