तिसऱ्या कसोटीसाठी ॲटकिन्सनचे इंग्लंडच्या चमूत पुनरागमन

२७ वर्षीय मध्यमगती फलंदाज गस ॲटकिन्सनचा भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या चमूत समावेश करण्यात आला आहे. एकूण १६ खेळाडूंचा समावेश असलेल्या या चमूत इंग्लंडकडे ॲटकिन्सन व्यतिरिक्त जोफ्रा आर्चर, सॅम कूक व जेमी ओव्हर्टन असेही वेगवान गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत.
तिसऱ्या कसोटीसाठी ॲटकिन्सनचे इंग्लंडच्या चमूत पुनरागमन
Published on

लंडन : २७ वर्षीय मध्यमगती फलंदाज गस ॲटकिन्सनचा भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या चमूत समावेश करण्यात आला आहे. एकूण १६ खेळाडूंचा समावेश असलेल्या या चमूत इंग्लंडकडे ॲटकिन्सन व्यतिरिक्त जोफ्रा आर्चर, सॅम कूक व जेमी ओव्हर्टन असेही वेगवान गोलंदाजांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटीसाठी ख्रिस वोक्स, जोश टंग व ब्रेडन कार्स यांच्यापैकी एकाला वगळून अन्य तिघांपैकी कुणाला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ॲटकिन्सन मे महिन्यात झालेल्या स्नायूंच्या दुखापतीमुळे दोन महिने क्रिकेटपासून दूर होता. इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रँडन मॅकक्युलमने तिसऱ्या कसोटीसाठी उसळी घेणारी तसेच वेगवान गोलंदाजांसाठी पोषक खेळपट्टीची मागणी केली आहे.

इंग्लंडचा संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर, जोफ्रा आर्चर, गस ॲटकिन्सन, जेकब बेथल, सॅम कूक, जेमी ओव्हर्टन.

logo
marathi.freepressjournal.in