इंग्लंड-श्रीलंका टी-२० मालिका : ब्रूकची वादळी खेळी; श्रीलंकेचा धुव्वा

इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने ठोकलेल्या ४९ चेंडूंतील नाबाद ११४ धावांच्या जोरावर इंग्लंडने मंगळवारी मध्यरात्री पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ११९ धावांनी धुव्वा उडवला. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने या विजयाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंड-श्रीलंका टी-२० मालिका : ब्रूकची वादळी खेळी; श्रीलंकेचा धुव्वा
इंग्लंड-श्रीलंका टी-२० मालिका : ब्रूकची वादळी खेळी; श्रीलंकेचा धुव्वा
Published on

साऊदम्पटन : इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने ठोकलेल्या ४९ चेंडूंतील नाबाद ११४ धावांच्या जोरावर इंग्लंडने मंगळवारी मध्यरात्री पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ११९ धावांनी धुव्वा उडवला. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने या विजयाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या इंग्लंडने ४ बाद २५४ धावांचा डोंगर उभारला. ब्रूकने आपल्या खेळीत १० चौकार आणि ६ षटकार मारले. यासह ब्रूकने टी-२० फॉरमॅटमध्ये न बाद होता सलग २८८ धावा केल्या आहेत. यापूर्वी जुलैमध्ये भारत दौऱ्यावर त्याने नाबाद ७९ आणि नाबाद ९५ धावांच्या खेळी खेळल्या होत्या.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ पूर्णपणे ढेपाळला व १९ षटकांत १३५धावांत गारद झाला. दुनिथ वेल्लालागेने सर्वाधिक ३३ धावा केल्या. टी-२० मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in