स्टोक्सची टी-२० विश्वचषकातून माघार

१ जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार असून इंग्लंडच्या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०२२मध्ये जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली होती.
स्टोक्सची टी-२० विश्वचषकातून माघार

लंडन : इंग्लंडचा ३२ वर्षीय अष्टपैलू बेन स्टोक्सने आगामी टी-२० विश्वचषक न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी प्रकारावर अधिक लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी स्टोक्सने आताच संघ व्यवस्थापनाला आपला निर्णय कळवला आहे. तसेच वाढत्या क्रिकेटमुळे तंदुरुस्ती टिकवून गोलंदाजीवरही लक्ष देण्यासाठी स्टोक्स टी-२० विश्वचषकात खेळणार नसल्याचे समजते.

१ जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिज येथे टी-२० विश्वचषक रंगणार असून इंग्लंडच्या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०२२मध्ये जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली होती. “मी अष्टपैलू म्हणून संघासाठी भविष्यातही योगदान देण्यास प्रयत्नशील आहे. त्यामुळेच मी आयपीएलनंतर टी-२० विश्वचषकातही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तंदुरुस्तीवर अधिक मेहनत घेऊन मला कसोटीवर लक्ष द्यायचे आहे. इंग्लंडच्या संघाला माझ्या शुभेच्छा,” असे स्टोक्स म्हणाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in