इंग्लंडच्या 'या' अष्टपैलू खेळाडूची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती

मी इंग्लंडकडून वन-डे क्रिकेटमधील माझा शेवटचा सामना मंगळवारी डरहॅममध्ये खेळणार आहे
इंग्लंडच्या 'या' अष्टपैलू खेळाडूची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
Published on

इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताविरुद्धची मालिका हरल्यानंतर बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केले. स्टोक्स सध्या इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार असून तो टी-२० आणि कसोटी क्रिकेट मात्र खेळत राहणार आहे. स्टोक्सने म्हटले आहे की, मी वन-डे फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मी इंग्लंडकडून वन-डे क्रिकेटमधील माझा शेवटचा सामना मंगळवारी डरहॅममध्ये खेळणार आहे. दरम्यान, बेन स्टोक्स निवृत्तीबाबत म्हणाला की, तीनही क्रिकेट प्रकारात खेळणे माझ्यासाठी आता शक्य नाही. तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी माझे शरीर आता साथ देत नाही. व्यस्त वेळापत्रकामुळे दमछाक होते. तसेच मला असे वाटते की, मी एका दुसऱ्या खेळाडूची जागा देखील घेत आहे. तो खेळाडू संघासाठी आपले १०० टक्के योगदान देऊ शकतो.

स्टोक्सने एप्रिल महिन्यात इंग्लंडच्या कसोटी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. बेन स्टोक्स २०१९मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत सामनावीर ठरला होता. इंग्लंडने लॉर्ड्सवर न्यूझीलंडचा पराभव करत इतिहासात पहिल्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले होते. दरम्यान, स्टोक्सच्या डोक्यात कसोटी क्रिकेटवर फोकस करण्याचा विचार हा आयपीएलच्या १५व्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच घोळत होता. त्याने कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर आल्यानंतर आयपीएलमधून माघार घेतली होती. आता स्टोक्स फक्त कसोटी खेळणार की, टी-२०देखील खेळणार याबाबत संभ्रम आहे. तो आयपीएलसाठीही उपलब्ध असणार की नाही, हेदेखील अस्पष्टच आहे.

logo
marathi.freepressjournal.in