इंग्लंडच्या दिग्गज गोलंदाजची जडेजाने चांगलीच जिरवली

जडेजा आणि अँडरसन यांच्यामध्ये आठ वर्षांपासून सतत वाद सुरू आहेत.
 इंग्लंडच्या दिग्गज गोलंदाजची जडेजाने चांगलीच जिरवली

इंग्लंडविरुध्दच्या पुनर्नियोजित एजबॅस्टन कसोटीत भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने शतक झळकविल्याने त्याची ‘निव्वळ फलंदाज’ अशी खिल्ली उडविणारा इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसनची स्वत: जडेजाने चांगलीच जिरवली. २०१४ नंतर अँडरसनला मी फलंदाजी करू शकतो, हे समजले ती चांगली गोष्ट आहे, असा टोला जडेजाने लगावला.

जडेजा आणि अँडरसन यांच्यामध्ये आठ वर्षांपासून सतत वाद सुरू आहेत. २०१४ मध्ये झालेल्या एका कसोटी सामन्यात दोघांचा जोरदार वाद झाला होता. तेव्हा जेम्स अँडरसनने जडेजाला ड्रेसिंग रूममध्ये येऊन मारण्याची धमकी दिली होती.

शतकानंतर जडेजा स्वत:ला आता फलंदाज समजत असल्याचा खोचक टोमणा अँडरसनने मारला होता. त्याला जडजाने सडेतोड उत्तर दिले. अँडरसनच्या विधानाबाबत जडेजा म्हणाला, जेव्हा मी धावा करतो तेव्हा प्रत्येकजण म्हणतो मी आता फलंदाज झालो आहे. मी नेहमी खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करतो. ही चांगली गोष्ट आहे की २०१४ नंतर जेम्स अँडरसनला समजले की मी फलंदाजी करू शकतो.

अँडरसन म्हणाला होता की, भारतीय संघातील हा अष्टपैलू खेळाडू स्वत:ला आता फलंदाज समजू लागला आहे. तो आता थोडा वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत आहे. त्याला फलंदाजीची समज आल्यामुळे आमच्या अडचणी वाढल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in