England Cricket : वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' इंग्लंड क्रिकेटपटूंने घेतली निवृत्ती

गेली अनेक वर्ष इंग्लड (England Cricket) संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या या क्रिकेटपटूंच्या अनेक विक्रम मोडीत काढत जागतिक क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे
England Cricket : वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' इंग्लंड क्रिकेटपटूंने घेतली निवृत्ती

इंग्लंड (England Cricket) संघातील दिग्गज क्रिकेटपटू इऑन मॉर्गनने (Eoin Morgan) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या नेतृत्त्वात इंग्लंडने २०१९ साली आयसीसी विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. एक निवेदन पत्र काढून त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यात तो म्हणाला की, खेळापासून दूर होण्याची हीच खरी वेळ आहे. गेली १६ वर्षे त्याने इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. तर, १२६ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपद भूषवले आहे. ज्यामध्ये, ७६ सामन्यात इंग्लडला विजय मिळाला आहे.

मॉर्गनने आपल्या कारकिर्दीत एकूण २५८ एकदिवसीय सामने खेळले. ज्यामध्ये त्याने ७७०१ धाव केल्या असून यात १४ शतकांचा समावेश आहे. तर, एकूण १६ कसोटींमध्ये त्याने ७०० धावा केल्या असून २ शतके केली आहेत. तसेच, टी- २०मध्येही १०२ सामने खेळून २३११ धाव केल्या आहेत. इंग्लंडकडून खेळण्याआधी त्याने आयर्लंड संघाचेदेखील प्रतिनिधित्व केले. त्याने २००६ ते २००९ या वर्षात आयर्लंडकडून खेळताना २३ एकदिवसीय सामन्यात ७४४ धावा केल्या होत्या ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in