अश्वारोहणपटू अनुष ऑलिम्पिकसाठी पात्र

वर्षभरातील चार स्पर्धांच्या कामगिरीच्या आधारे अनुष २६ जुलैपासून रंगणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
अश्वारोहणपटू अनुष ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली : गतवर्षी भारताासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत ४१ वर्षांनी अश्वारोहणात सुवर्णपदक जिंकणारा अनुष अग्रवाल पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. ड्रेसेज विभागात अनुषने ऑलिम्पिकची पात्रता मिळवली आहे, असे भारतीय अश्वारोहण महासंघाने (ईएफआय) जाहीर केले.

वर्षभरातील चार स्पर्धांच्या कामगिरीच्या आधारे अनुष २६ जुलैपासून रंगणाऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने व्रोक्लॉ (७३), नेदरलँड्स (७४), फँकफर्ट (७२) व बेल्जियम (७४) या चार स्पर्धांमध्ये दमदार गुण कमावले. ड्रेसेज हा घोडेस्वारीचा एक प्रकार आहे. याचा सराव मुख्यत्वे हा वैयक्तिक प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी केला जातो. प्रदर्शन आणि स्पर्धा अशा दोन पद्धती प्रचलित आहेत. थोडक्यात याला घोड्यावरील कवायत असे म्हणता येऊ शकेल. समतोल, लवचिकता साधून घोडा चालवणे हे या स्पर्धा प्रकाराचे खरे तंत्र आहे. यामध्ये घोडेस्वाराकडून घोड्याला कसे प्रशिक्षण दिले जाते हे सर्वात महत्त्वाचे ठरते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in