विश्वचषक संघात समावेश करून देखील 'या' स्टार खेळाडूला पाठवले घरी

पुन्हा उशिर झाला तर टी-२० वर्ल्ड कप टीममधून स्थान गमवावे लागेल, असे त्याला सांगण्यात आले होते. बोर्डाने आधी इशारा देऊन नंतर कारवाई केली
विश्वचषक संघात समावेश करून देखील 'या' स्टार खेळाडूला पाठवले घरी
ANI

वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज शिमरॉन हेटमायर एअरपोर्टवर वेळेत पोहोचला नाही म्हणून टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर गेला. शिक्षा म्हणून त्याला ठी-२० वर्ल्ड कप टीममधील स्थान गमवावे लागले. वेस्ट इंडिज बोर्डाने कठोर पाऊल उचलत त्याला शिक्षा दिली. त्याच्याजागी शेमार ब्रूक्सला संधी दिल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने दिली.

शिमरॉन वेळेवर एअरपोर्टवर वेळेवर पोहोचू न शकल्याने त्याला ऑस्ट्रेलियाला जाणारे विमान पकडता आले नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने शिमरॉनला थेट बाहेरचा रस्ता दाखविला. त्याच्याजागी शेमा ब्रूक्सला टीममध्ये संधी दिली. १४ सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या वेस्ट इंडिज संघात शेमार ब्रूक्सचा समावेश नव्हता.

उड्डाणाची बदलली होती वेळ

वेस्ट इंडिज बोर्डाने याआधीसुद्धा हेटमायरसाठी फ्लाइट रिशेड्यूल केले होते. त्याला १ ऑक्टोबर म्हणजे शनिवारी ऑस्ट्रेलियाला रवाना व्हायचे होते; पण त्याने कौटुंबिक कारण सांगितले. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी सोमवारी फ्लाइट रिशेड्यूल करण्यात आले होते. यावेळीसुद्धा हेटमायर वेळेवर विमानतळावर पोहोचला नाही. त्यामुळे त्याची फ्लाइट मिस झाली. हेटमायरचे विमान तर चुकलेच; त्याबरोबरच वर्ल्ड कपचे तिकिटही कापले गेले.

आधी इशारा देऊन नंतर कारवाई

संघाबाहेर करण्याच्या निर्णयाबाबत शिमरॉनला वेस्ट इंडिज बोर्डाकडून आगाऊ माहिती देण्यात आली होती. फ्लाइट रिशेड्यूल करतानाच कल्पना दिली होती. पुन्हा उशिर झाला तर टी-२० वर्ल्ड कप टीममधून स्थान गमवावे लागेल, असे त्याला सांगण्यात आले होते. बोर्डाने आधी इशारा देऊन नंतर कारवाई केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in