भारताच्या अंडर-१७ फुटबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची हकालपट्टी

१७ वर्षांखालील महिला संघाचे सहाय्यक मुख्य प्रशिक्षक अ‍ॅलेक्स अ‍ॅम्ब्रोस यांना लैंगिक गैरवर्तणुकीमुळे बडतर्फ करण्यात आले आहे.
भारताच्या अंडर-१७ फुटबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची हकालपट्टी

अल्पवयीन मुलींसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून भारताच्या अंडर-१७ महिला फुटबॉल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अॅलेक्स अॅम्ब्रोस यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली. मुख्य प्रशिक्षक थॉमस डेनरबी हे या प्रकाराचे साक्षीदार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे (एआयएफएफ) याबाबत तक्रार नोंदविली होती. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे सदस्य (सीओए) डॉ. एस वाय कुरैशी यांनी सोशल मीडियावर याबाबतचा निर्णय जाहीर केला.

कुरैशी यांनी ट्विट केले की, १७ वर्षांखालील महिला संघाचे सहाय्यक मुख्य प्रशिक्षक अ‍ॅलेक्स अ‍ॅम्ब्रोस यांना लैंगिक गैरवर्तणुकीमुळे बडतर्फ करण्यात आले आहे. अ‍ॅम्ब्रोस यांना युरोपच्या प्रशिक्षण आणि एक्सपोजर दौऱ्यादरम्यान एका खेळाडूसोबत गैरवर्तणूक केल्याबद्दल निलंबित करण्यात आले असून नॉर्वेमधून परत बोलावण्यात आले आहे. यापूर्वी ३० जून रोजी, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आरोपीचे नाव न घेता किंवा गुन्हा निर्दिष्ट न करता, अधिकृत निवेदनाद्वारे या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. अंडर-१७ महिला फुटबॉल संघ सध्या या वर्षाच्या शेवटी भारतात होणाऱ्या फीफा अंडर-१७ महिला विश्वचषकापूर्वी युरोप दौऱ्यावर आहे. भारताला त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात इटलीकडून मोठा पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर चिलीकडून १-३, मेक्सिकोकडून ०-२ आणि नेदरलँड्सकडून ५-१ असा पराभवाचा सामना करावा लागला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in