भारताच्या 'या' गोलंदाजाचा क्रिकेटच्या सर्व प्रकारातून अलविदा

राहुलने आपल्या करिअरमध्ये आयपीएलमधील वेगवेगळ्या संघांकडून खेळून आपली धमक दाखविली.
भारताच्या 'या' गोलंदाजाचा क्रिकेटच्या सर्व प्रकारातून अलविदा
Published on

भारताचा गोलंदाज राहुल शर्माने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

राहुलने आपल्या करिअरमध्ये आयपीएलमधील वेगवेगळ्या संघांकडून खेळून आपली धमक दाखविली. आयपीएलसोबतच त्याने भारतीय क्रिकेट संघाचेदेखील प्रतिनिधित्व केले. त्याने चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यातगोलंदाजी केली; मात्र करिअरला निश्चित दिशा मिळालेली असतानाच त्याच्यावर ड्रग्जसेवनाचे आरोप करण्यात आले. परिणामी, निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला. ऐन उमेदीच्या काळात त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले.

राहुलने आयपीएलमध्ये २०१० मध्ये पदार्पण केले. या हंगामात त्याने डेक्कन चार्जर्स संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर २०११च्या हंगामात तो पुणे वॉरिअर्स संघाकडून खेळला. या हंगामात त्याने एकूण १६ विकेट्स घेतले होते. त्यानंतर त्याची भारतीय संघातही निवड झाली.

२०१४मधील आयपीएल हंगामात तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला. त्यानंतर २०१५ मध्ये त्याला चेन्नई सुपरकिंग्ज संघाने खरेदी केले होते.

logo
marathi.freepressjournal.in