महान टेनिससम्राज्ञीचा निरोप? अखेरचा सामना खेळल्याचे संकेत

तिसऱ्या फेरीतील या सामन्यात सेरेनाचा अजला तोमलजनोविकने ७-५, ६-७, ६-१ असा पराभव केला.
महान टेनिससम्राज्ञीचा निरोप? अखेरचा सामना खेळल्याचे संकेत

महान टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. या पराभवासह सेरेनाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. सुस्पष्टपणे कोणतीही घोषणा न करताच अखेरचा सामना खेळल्याचे संकेत देत टेनिससम्राज्ञीने निरोप घेतला.

सेरेनाच्या कारकीर्दीतील हा शेवटचा सामना असल्याचे मानले जात आहे; मात्र तिने निवृत्तीबाबत काहीही स्पष्ट केले नसले, तरी सेरेनाने चाहत्यांना ज्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या, त्यावरून तिचा हा अखेरचा सामना असल्याचेच ध्वनीत होत आहे. तिसऱ्या फेरीतील या सामन्यात सेरेनाचा अजला तोमलजनोविकने ७-५, ६-७, ६-१ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन केले; मात्र तिसऱ्या सेटमध्ये अजलाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत हा सेट आणि सामना जिंकला. सेरेनाने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला टेनिसमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. अशा स्थितीत अमेरिकन ओपननंतर निवृत्ती घेईल, असे मानले जात होते.

आनंदाश्रूंसह सर्वांचे आभार

अनेक दशकांपासून मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार. मला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या पालकांची मी आभारी आहे. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू असतील. धन्यवाद बाबा, मला माहीत आहे की, तुम्ही बघतच असाल. धन्यवाद आई.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in