एफसी गोवाने प्रतिष्ठेच्या २६ खेळाडूंचा संघ जाहीर;फ्रांगकी बुआम, आयुष छेत्री यांचा समावेश

मुख्य संघ प्रशिक्षकाची जबाबदारी डेंगी कार्डोझो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
एफसी गोवाने प्रतिष्ठेच्या २६ खेळाडूंचा संघ जाहीर;फ्रांगकी बुआम, आयुष छेत्री यांचा समावेश

ड्युरँड चषक २०२२ स्पर्धेसाठी गतविजेता एफसी गोवाने प्रतिष्ठेच्या २६ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. संघात हृतिक तिवारी, मुहम्मद नेमिल, फ्रांगकी बुआम आणि आयुष छेत्री या फर्स्ट टीम संघातील चार खेळाडूंना स्थान दिले आहे. यंदाची ड्युरँड चषक १६ ऑगस्ट ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत कोलकाता, गुवाहाटी आणि इम्फाळ येथे खेळली जाणार आहे.

मुख्य संघ प्रशिक्षकाची जबाबदारी डेंगी कार्डोझो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. गोवा संघ हा २०१९ आणि २०२१ या दोन ड्युरँड चषक स्पर्धेत सहभागी झाला होता. मागील हंगामात अपराजित राहताना त्यांनी ट्रॉफी उंचावली होती.

एफ.सी.ए. ग्रुपमध्ये समावेश असून त्या मोहमेडन एफसीसह बंगळुरू एफसी, जमशेदपूर एफसी आणि इंडियन एअर फोर्स संघांचा समावेश आहे.

एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्डोझो यांनी कोलकाता येथे रवाना होण्यापूर्वी सांगितले की, आमच्या सर्वच खेळाडूंना त्यांची खेळाची क्षमता दाखवून देण्याची संधी आहे. आमच्या संघात अनेक नवोदित असून स्वतःला सिद्ध करण्यासाठी ते उत्सुक आहेत. आमच्या संघातील वातावरण उत्साहपूर्ण आहे. आम्ही कसून सराव केला.

त्यांनी स्पष्ट केले की, संघाच्या अंतर्गत सामने खेळून आम्ही सर्वसमावेशक टीम बनवली आहे. त्यामुळे सातत्य राखता येईल.

ड्युरँड चषक २०२२ स्पर्धेत यंदा एफसी गोवा संघाची सलामीला (१६ ऑगस्ट) गाठ मोहमेडन एससीशी पडेल. मोहमेडन एफसी संघ गतवेळचा उपविजेता आहे. त्यामुळे ओपनिंगलाच चुरशीचा खेळ अपेक्षित आहे.

एफसी गोवा संघ : गोलकीपर्स : ऋतिक तिवारी, हॅन्सल कोइल्हो, बॉब जॅक्सन. डिफेंडर्स (बचावपटू): देल्झन पासान्हा, रायन रॉजर मेनेझेस, लेस्ली रिबेलो, आदित्य साळगावकर, मॅलिकजन कॅलेगर, दिशांक कुणकुळीकर, सलमान फॅरिस. मिडफिल्डर (मधली फळी) : लालरेमृआटा एचपी, वेलरॉय फर्नांडेस, डेल्टन कोलॅको, मालसावलुअंगा, डेव्हिस फर्नांडेस, रायन मेनेझिस, अँथनी फर्नांडेस, आयुष छेत्री, मुहम्मद नेमिल, शॅनन व्हिगास. फॉरवर्ड्स : वासिम इनामदार, फ्रांगकी बुआम, मेवन डियास, सॅलगेओ डायस, जॉर्डन बोर्गेस.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in