फेडररची अखेरची स्पर्धा आजपासून सुरु होणार

२० ग्रँडस्लॅम विजेत्या ४१ वर्षीय फेडररने काही दिवसांपूर्वीच निवृत्ती जाहीर करताना लेव्हर चषक अखेरची स्पर्धा असेल
फेडररची अखेरची स्पर्धा आजपासून सुरु होणार

टेनिससम्राट म्हणून नावलौकिक मिळवणारा स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर शुक्रवारपासून कारकीर्दीतील अखेरची एटीपी स्पर्धा खेळणार आहे. लेव्हर चषक टेनिस स्पर्धेला शुक्रवारपासून प्रारंभ होणार असून यासाठी फेडरर आणि राफेल नदाल दुहेरीत युरोप संघाकडून एकत्र खेळताना दिसतील.

२० ग्रँडस्लॅम विजेत्या ४१ वर्षीय फेडररने काही दिवसांपूर्वीच निवृत्ती जाहीर करताना लेव्हर चषक अखेरची स्पर्धा असेल, असे सांगितले. त्यामुळे तीन दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले असून फेडरर-नदाल जागतिक संघातील फ्रान्सेस टियाफो आणि जॅक सॉक यांच्याविरुद्ध पुरुष दुहेरीत खेळतील. एकेरीत कॅस्पर रूड आणि सॉक आमनेसामने येतील. अन्य लढतीत स्टेफानोस त्सित्सिपास आणि दिएगो श्वार्ट्झमन एकमेकांविरुद्ध खेळतील. एकेरीच्या तिसऱ्या लढतीत अँडी मरेचा अॅलेक्स डी मिनॉरशी सामना होईल.

वेळ : सायंकाळी ५ वा.

थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in