उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी महिला खेळाडू दोषी; राष्ट्रकुल स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता

द्रव्य चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सहभागी होऊ शकली नाही तर भारतीय रिले संघाला फक्त चार खेळाडूंनिशी स्पर्धेत उतरावे लागेल
उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी महिला खेळाडू दोषी; राष्ट्रकुल स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता
Published on

राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असतानाच भारतीय महिला चार बाय शंभर मीटर रिले संघातील एक खेळाडू बंदी असलेले उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणी दोषी आढळून आली. त्यामुळे ही खेळाडू राष्ट्रकुल स्पर्धेतून बाद होण्याची दाट शक्यता आहे. या खेळाडूचे नाव उघड करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झालेल्या रिले संघातील एका सदस्याची उत्तेजक द्रव्य चाचणी पॉझिटिव्ह आल्याने ती खेळाडू माघार घेईल, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले होते.

जर राष्ट्रकुल स्पर्धेतसाठीच्या चार बाय शंभर मीटर रिलेच्या संघातील खेळाडू उत्तेजक द्रव्य चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सहभागी होऊ शकली नाही तर भारतीय रिले संघाला फक्त चार खेळाडूंनिशी स्पर्धेत उतरावे लागेल. जर एखाद्या खेळाडूला जरी दुखापत झाली तर इतर ट्रॅक अँड फिल्ड प्रकारातील खेळाडूला या संघात घ्यावे लागले. याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, असे सांगण्यात येते.

अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने यापूर्वी द्युती चंद, हिमा दास, स्रबानी नंदा, एन.एस. सिमी, सेकार धनलक्ष्मी आणि एम. व्ही. जिलना यांचा समावेश ३७ अॅथलेटिक्स सदस्यांच्या संघात केला होता. मात्र भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने अॅथलेटिक्सला फक्त ३६ खेळाडूंचा कोटा मंजूर केल्यानंतर जिलनाने माघार घेतली होती. धनलक्ष्मी उत्तेजक चाचणीत दोषी आढळून आल्याने पुन्हा जिलनाला संघात समाविष्ट करण्यात आले. आता उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळलेली खेळाडू ही ऐनवेळी संघात आली होती. मात्र तिचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

राष्ट्रकुल संघातील दोन खेळाडू सेकार धनलक्ष्मी आणि ट्रिपल जंपर ऐश्वर्या बाबू यादेखील उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्यांना भारतीय राष्ट्रकुल स्पर्धेच्या संघातून वगळण्यात आले होते. धनलक्ष्मी दोन स्पर्धेबाहेरच्या चाचण्यात दोषी आढळली. ऐश्वर्या दोन स्पर्धांच्या चाचण्यात दोषी आढळली होती.

logo
marathi.freepressjournal.in